औंढा नागनाथ: तहसीलदार हरीश गाडे यांच्या पथकाची नागेशवाडी जवळ अवैध गौणखणीज वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्पर वर कारवाई
औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी जवळ तहसीलदार हरीश गाडे,तलाठी गजानन गुंजकर, मल्लिकार्जुन कापसे, दीपक जाधव यांच्या पथकाने दिनांक 11 नोव्हेंबर मंगळवार रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास अवैध गौण खनिज मुरमाची वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्पर क्रमांक एम एच 35 एजे 3099 वर कारवाई करून सदरील हायवा टिप्पर वाहन औंढा नागनाथ तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावण्यात आले असून पुढील कारवाई सुरू असल्यास माहिती पथकाने दिली आहे