नाशिक: साखरपुड्यातून 125 ग्रॅम सोन छत्तीसगड येथून हस्तगत : आडगाव पोलिसांची कामगिरी : कर्णिक यांचे शाब्बासकीपत्र
Nashik, Nashik | Nov 28, 2025 नाशिकच्या आडगाव परिसरातील स्वामी नारायण हॉलमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमातून चोरी गेलेले १२५ ग्रॅम सोन्याचे दागिने आडगाव गुन्हे शोध पथकाने मध्यप्रदेशातून हस्तगत केले आहेत. ६ नोव्हेंबर रोजी नागपूरहून आलेल्या कुटुंबीयांची पर्स कार्यक्रमादरम्यान चोरी झाली होती. पर्समध्ये मंगळसूत्र, कंठी हार, झुमके, रोख २५ हजार आणि मोबाईल असा ऐवज होता. सीसीटीव्ही तपास, बातमीदारांच्या माहितीवरून मध्यप्रदेशात छापा टाकला. आरोपी घरात नसतानाही त्याच्या नातेवाईकांकडून १२.५ लाखांचे दागिने जप्त करण्यात आले.