केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा "राष्ट्रीय गोपाल रत्न-२०२५" पुरस्काराचे वाटप करण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) येथील श्रद्धा ढवण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. देशी गाई-म्हशींच्या संगोपनातून उत्कृष्ट दुग्ध उत्पादन व व्यवस्थापन केल्याबद्दल हा मानाचा सन्मान त्यांना मिळाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री एस. पी. बघेल आणि जॉर्ज कुरिअन यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.