गोंदिया: एकोडी येथे घरच्या विहिरीत नवजात बालकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Gondiya, Gondia | Nov 29, 2025 एकोडी येथे राजेंद्र श्रीराम ठाकरे यांच्या घराच्या आवारातील विहिरीत शनिवारी (२९ नोव्हेंबर २०२५) सकाळी एका नवजात अर्भकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सकाळी सुमारे 7.00 वाजता घरमालक राजेंद्र ठाकरे विहिरीत पाणी काढताना मृतदेह दिसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी तात्काळ गंगाझरी पोलीस ठाण्याला माहिती दिली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सुधीर वर्मा यांच्या पथकाने त्वरित दाखल होऊन पंचनामा केला.