शेगाव: शेगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरू
शेगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून १७ नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशन भरता येणार आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक १३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता चौथ्या दिवशी प्रभाग ३ व प्रभाग १४ मधून नगरसेवक पदासाठी ५ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नगरसेवक पदासाठी प्रभाग १४ अ मधून उबाठा शिवसेना पक्षाकडून आशिष दामोदर गणगणे, भाजपाकडून गजानन सुकदेव लहाने, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून विलास तुकाराम मसने यांनी नामनिर्देशन दाखल केले आहे.