कोरेगाव: कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढा; अन्यथा आंदोलन करणार, मनसेचा इशारा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोरेगाव तालुकाध्यक्ष सागर संभाजी बर्गे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सायंकाळी पाच वाजता प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी व पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात कोरेगाव शहरातील ऊस वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या गंभीर वाहतूक कोंडीबाबत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा मनसेच्या स्टाईलमध्ये तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.