पैठण तालुक्यातील पाचोड येथील एसबीआय बँकेच्या एटीएम ला आग लागल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली दरम्यान शुक्रवार रोजी याबाबत पंचनामा करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की पाचोड बस स्थानक परिसरात असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम मधून अचानक दूर निघत असल्याचे नागरिकांचे लक्षात आले त्यांनी तात्काळ तिथे धाव घेतली असता वायर पार्किंग मुळे आग लागल्याचे नागरिकांच्या निदर्शनात आले दरम्यान नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला याबाबत एटीएम चे किती नुकसान झाले हे अद्याप कळू शकले नाही