खंडाळा: खंबाटकी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; एस. टी. बस बंद पडल्याने वाहतुक जवळपास दोन तास ठप्प वाहनचालक हैराण
पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर गुरुवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास सातारा-पुणे मार्गावर खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबली आहे. सातारा स्वारगेट मार्गावर धावणारी विना वाहक विना थांबा एस. टी. बस भररस्त्यात बंद पडल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग सुरक्षा विभागाने तातडीने हालचाल करत सायंकाळी सात वाजल्यापासून वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. रात्री उशिरापर्यंत वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.