औंढा नागनाथ: शिरला तांडा येथील दरोडेच्या गुन्ह्यातील १ लाख ६० हजारचा मुद्देमाल फिर्यादीस पोलीस ठाणे येथे केला परत
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरला तांडा येथे शस्त्राचा धाक दाखवून टाकलेल्या दरोड्यात चोरट्यांनी १ लाख ६० हजार रुपयाचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी २० जुलै रोजी फिर्यादी तुकाराम रणवीर यांच्या फिर्यादीवरून औंढा ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा साह्य पोलीस निरीक्षक कैलास भगत यांनी तपास करून चोरट्याकडून मुद्देमाल हस्तगत केला व दिनांक 10 नोव्हेंबर सोमवार रोजी सदर मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात आला