संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या शालार्थ आयडी व शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशी सुरु आहेत, त्यामध्ये अनेक शिक्षण उपसंचालक यांचेसह त्या कार्यालयातील अधिकारी, शिक्षणाधिकारी व काही संस्थेचे संचालक यांचेवर गुन्हे दाखल झालेले आहे, यामध्ये जवळपास 650 शिक्षक बोगस असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे, मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळा व गैरमार्गाने शिक्षक व शिक्षकेतर भरती प्रकरणी चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर या शैक्षणिक संस्थेसह इतर शैक्षणिक संस्था संचालकांवर एसआपटी मार्