राज्यातील कायम अनुदानित शिक्षकांना टीईटी परीक्षेची सक्ती करण्यात आली आहे. या विरोधात जिल्हा प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी राज्यभर आज शाळा बंद आंदोलन केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे.