एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्घटना तालुक्यातील घोडेगाव येथे घडली. विनोद कारभारी जाधव (३५) असे मृताचे नाव आहे. विनोदने गळफास घेऊन नेमकी आत्महत्या का केली याची माहिती सायंकाळपर्यंत समोर आली नव्हती. मंगळवारी विनोदने घरात कोणीही नसल्याचे पाहून घरातील पंख्याच्या लोखंडी हुकला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. सायंकाळी घटना उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.