कोरेगाव: रहिमतपूरमध्ये नवरात्रोत्सव होणार डॉल्बीमुक्त;सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिली शपथ
डॉल्बीमुक्त नवरात्रीचा मुख्य उद्देश ध्वनिप्रदूषण कमी करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि लोकांना शांततामय वातावरणात उत्सव साजरा करण्याची संधी देणे हाच आहे, असे रहिमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांनी स्पष्ट केल्यानंतर नवरात्री उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉल्बी न वाजविण्याचा निर्धार केला. कांडगे पाटील यांनी सर्वांना डॉल्बीमुक्तीची शपथ देवविली. पोलिस ठाण्यात नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने नवरात्र मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्त्यांची बैठक झाली.