हवेली: लग्नाचा तगादा लावणाऱ्या विवाहित प्रेयसीचा निर्दयी खून; थेरगाव-वाकड परिसरात खळबळ
Haveli, Pune | Nov 30, 2025 पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथे एका विवाहित महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहित प्रियकरावर सतत विवाहाचा आग्रह धरण्यामुळे त्याने विवाहित प्रेयसीचा जीव घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.मृत विवाहितेचे नाव राणी विशाल गायकवाड (२६, रा. वाकड) असून आरोपी अनिकेत महादेव कांबळे (३३, रा. थेरगाव) याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.