ठाणे: शासनाच्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव
Thane, Thane | Nov 6, 2025 आदिवासी बचाव, कातकरी बचाव ही टॅगलाईन घेऊन कालपासून श्रमजीवी संघटनेने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन सुरू केलं आहे. कातकरी समाजातील मुलींची खरेदी विक्री रोखण्याबाबत व इतर मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात येत आहे. मात्र आज दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 2च्या सुमारास श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.