कोरची: कोरची–नागपूर ही देवरी मार्गे बस सेवा सुरु करा, राष्ट्रवादी कांग्रेस कार्यकर्तांची आगार व्यवस्थापकाकडे मागणी
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल कोरची तालुक्यातून नागपूरकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांना थेट सूविधा नसल्याने अडचण आहे नागपूर करीता खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो त्यामूळे एस टी महामंडळाने कोरची–नागपूर ही देवरी मार्गे बस सेवा सुरु करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यानी दि.१६ सप्टेबंर मंगळवार रोजी दूपारी १२ वाजता आगर व्यवस्थापक राज्य परिवहन महामंडळ गडचिरोली याना निवेदन देत केली आहे.