सेलू: सिंदी (रेल्वे) येथे अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई; ₹६०,६०० किमतीचा देशी दारू साठा जप्त
Seloo, Wardha | Nov 24, 2025 पोलिस स्टेशन सिंदी (रेल्वे) येथील पथकाने गुप्त माहितीद्वारे केलेल्या धाडीत ₹६०,६०० किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई दिनांक २४ नोव्हेंबर सोमवार रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास करण्यात आली. दिनेश नेवारे रा. सिंदी रेल्वे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अशी माहिती सिंदी पोलिसांनी दिली.