रामटेक: अवकाळी पावसाने रामटेक तालुक्यातील काचुरवाही,हातोडी,मानापुर, भोजापुर, चोखाळा परिसरातील धान, कापूस पिकांना नुकसान
Ramtek, Nagpur | Oct 31, 2025 वातावरणात अचानक बदल होऊन गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबरला आलेल्या अवकाळी पावसाने रामटेक तालुक्यातील काही भागात पिकांना मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी शी आलेला घास निसर्गाने हिराहून घेतल्याने शेतकऱ्यात नैराश्य पसरले आहे. शुक्रवार दि. 31 ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता पासून काही शेतकऱ्यांनी आपबीती सांगितली. माहितीप्रमाणे भोजापुर, मानापुर, नगरधन, काचूरवाही,हातोडी, चोखाळा, नवरगाव परिसरात अवकाळी पावसाने धान व कापूस पिकाला मोठे नुकसान पोहोचवले आहे.