संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बदल : समीर बावनकर यांची नवी शहर पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती संगमनेर : शहर पोलीस ठाण्यात अधिकारी बदल करण्यात आला असून पारनेर येथून बदलीवर आलेले पोलीस निरीक्षक समीर बावनकर यांनी संगमनेर शहर पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी आपला कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण करून संगमनेरकर जनतेचा मनःपूर्वक आभार मानला आहे.