चिखली: पेट्रोल टाकून विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष काकडे यांच्या विरोधात पत्नीचा गंभीर आरोप
माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे निकटवर्तीय काँग्रेसचे युवा शहराध्यक्ष रिकी काकडे यांच्या पत्नी नमिता विशाल काकडे उर्फ रिकी काकडे यांनी व यांच्या परिवाराने अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला असल्याची तक्रार चिखली पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत चिखली पोलिसांनी रिकी काकडे यांना अटक केली असून घटनेचा तपास ठाणेदार भूषण गावंडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कड हे करीत आहे.