लातूर: आ.संभाजीराव पाटील निलंगेकरांनी आ.अमित देशमुखांना डिवचले, निलंग्याच्या नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकणारच,व्हिडीओ व्हायरल
Latur, Latur | Nov 30, 2025 लातूर -निलंग्याचे आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आमदार अमित देशमुख यांना थेट लक्ष्य करत डिवचले असून पुन्हा एकदा जोरदार टोला लगावला आहे. निलंग्याच्या नगरपरिषदेवरील आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकणार, असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी,निलंग्यातच नव्हे तर लातूर महानगरपालिकेतही आता भाजपचा झेंडा फडकणार आहे,असे स्पष्ट वक्तव्य केले. मात्र त्याच पद्धतीने आ.अमित देशमुख यांनी आमदार निलगेकर यांना जशास तसे सडेतोड उत्तर दिले असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.