उदगीर: छत्रपती शिवाजी महाराज चौकात टिप्परच्या धडकेत कारचे नुकसान, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Udgir, Latur | Nov 24, 2025 उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात २१ नोव्हेंबर रोजी टिप्पर चालकाने कारला धडक देऊन कारचे नुकसान केले याप्रकरणी उदगिर शहर पोलीस ठाण्यात २४ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, २१ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एम एच २६ एडी ०३१७ क्रमांकाच्या टिप्पर चालकाने टिप्पर निष्काळजीपणाने चालवून एम एच २४ एएस ०१३२ या क्रमांकाच्या कारला धडक देऊन ३० हजारांचे नुकसान केले,याप्रकरणी टिप्पर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे