खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीत तब्बल 82.26 टक्के नमतदान झाले मात्र हायकोर्टाच्या निर्णयानंतर चित्र पूर्ण बदलले आहे. खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर मतपेट्या नगरपरिषद कार्यालयातील वरच्या मजल्यावर स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. 21 डिसेंबर रोजी निकाल लागणार असल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूमबाहेर पहारा देत तळ ठोकला आहे. पोलिसांकडूनही स्ट्रॉंग रूम परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहेत.