राजुरा नगरपालिकेच्या निवडणुकीत शहरात प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीच भाजप पदाधिकारी पैसे वाटत असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार काल दि 2 डिसेंबर ला सायंकाळी 4 वाजता समोर आला आहे.काँग्रेसचे कामगार नेते सूरज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या नवीन व्हिडीओमध्ये भाजप पदाधिकारी हे राजुरा येथील प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजप उमेदवारांसाठी प्रत्येक मतदारास दोन हजार रुपयांचे आमिष दाखवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.