शिवसेना शिंदे गटाचे माजरी येथील ऊपशहर प्रमुख राहुल तालावर यांनी शिंदे गटाला सोडून शिवसेना ऊबाठा गटात पक्षकार्यालयात जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांच्या नेतृत्वात प्रवेश केला. आपण आता खऱ्या शिवसेनेत आलो असुन येणाऱ्या जिल्हा परिषद तथा पंचायत समिती निवडणुकांत पक्षाची मशाल घरोघरी पोहोचवू असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थीत होते.