चिखली: संकटग्रस्त गावांसोबत शासन, प्रशासनासह आम्ही मजबुतीने उभे आहोत–आमदार महाले पाटील,भाजपा पदाधिकारी यांचा दौरा व संवाद
चिखली मतदारसंघामधील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांचे बांध व मक्याला कोंब फुटले असून, जमीन खरडून पिके वाहून गेली आहेत. आज धाड जिल्हा परिषद सर्कलमधील या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार श्वेता ताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनात श्री. विष्णू पाटील वाघ, जिल्हा सरचिटणीस भाजपा बुलढाणा यांनी स्वतः मौढाळा, जांब, बोदेगाव, ढगारपूर, म्हसला बु, म्हसला खु. या गावांना भेट दिली. त्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.