पाथर्डी: रील स्टार कोमल ला बस मध्ये चोरी प्रकरणी पकडले असता,कोमल काळचे वकील म्हणतात, हे गुन्हे खोटे...!
पाथर्डी आगारातील बसमध्ये चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रिलस्टार कोमल काळेला अटक केली होती. या प्रकरणात तिला आज (ता. ५) शेवगाव न्यायालयात हजर करण्यात आले. तिच्या वकिलांनी ती निर्देष असून तिच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा युक्तीवाद केला आहे. न्यायालयाने सरकार पक्ष व आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेत तिला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.