कोरेगाव: औंध येथील श्री यमाई देवीचा शेंदुरजणे येथे उत्साहात मुक्काम; शेकडो वर्षांची परंपरा कायम, दिवाळीपेक्षाही मोठा जल्लोष
शेंदुरजणे, ता. कोरेगाव येथे औंध येथील श्री यमाई देवी आणि किन्हई येथील अंबाबाई देवी यांच्या पारंपरिक भेटीचा सोहळा पार पडल्यानंतर यमाई देवीचा एक दिवसाचा मुक्काम शेंदुरजणे गावात शनिवारी झाला. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या धार्मिक परंपरेनुसार देवीच्या आगमनाने गावात उत्साहाची लाट उसळली. बाहेरगावी गेलेले ग्रामस्थही देवीच्या दर्शनासाठी गावात परतले आणि संपूर्ण वातावरण भक्तिभावाने न्हाऊन निघाले. देवीच्या स्वागतासाठी गाव सजविण्यात आला होता. घराघरात दीप प्रज्वलित करण्यात आले.