ओम त्रिमूर्ती भजन मंडळ यांच्यावतीने आयोजित संत श्री गजानन महाराज सार्वजनिक देवस्थान,गजानन चौक,गोविंदपुर रोड,ओल्ड गोंदिया येथे सार्वजनिक कार्तिक उत्सवाच्या निमित्ताने संत श्री गजानन महाराज अभिषेक सोहळा मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने संपन्न झाला.या हरिपाठ कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर भक्तांसोबत हरिपाठामध्ये सहभागी झाले. या हरिनामाच्या गजरात भक्तजनांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि परिसरात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळाली.