गोंदिया: एन एच 53 वर भीषण दुर्घटना दोन ठार सात जण जखमी नैनपूर डुग्गीपार पेट्रोल पंपासमोरील घटना
Gondiya, Gondia | Nov 27, 2025 मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्र.53 वरील नैनपूर डुग्गीपार परिसरात आज दि.27 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.30 वाजेच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर थरकाप उडवणारा भीषण अपघात घडला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनर एमएच ३१ एफ सी ५८४१ ला नागपूरवरून रायपुरकडे धावणाऱ्या इरटिगा कार क्र. सीजी 04 पीव्ही 2282 ने जबर धडक दिली.धडकेचा आवाज परिसरात क्षणात घुमला आणि वाहन क्षणात चकणाचुर झाले या भीषण अपघातात 2 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले तर दोन जण सुखरूप बचावले आहेत.