धामणगाव रेल्वे: सुपलवाडा येथे युवकास दगड मारून केले जखमी; शिवीगाळ करून दिली मारण्याची धमकी
सुधाकर नामदेव राऊत रा.सुपलवाडा यांनी सतीश शामरावजी झाळे रा.धनोडी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. सतीश हा सुधाकर च्या भावाच्या दुकानात गेला व मनाला तू मला काल एरंडीचे तेल कमी दिले त्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. सतीश हा सुधाकर च्या भावाला शिवीगाळ करीत असताना सुधाकर मदात गेला असता सतीश ने रस्त्यावरील दगड घेऊन सुधाकर च्या नाकावर मारला व शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली अशी तक्रार सुद्धा कर यांनी पोलिसात दिली आहे. तेव्हा तळेगाव दशासर पोलिसांनी विविध कलमाने गुन्ह्याची नोंद केली