कुही: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उपबाजार कुही येथे कापूस बाजाराचा शुभारंभ
Kuhi, Nagpur | Nov 8, 2025 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उपबाजार कुही येथे कापूस बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. याबाबत चे वृत्त असे की शेतकऱ्यांचा शेतमाल निघायला सुरुवात झाल्याने उपबाजार कुही येथे कापूस बाजाराचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकरी, व्यापारी, अडते, यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. यावेळी कापूस पिकांची बोली करून कापूस विक्री करण्यात आला. यावेळी सभापती व उपसभापती आदी उपस्थित होते.