नगरपरिषद निवडणुकीची तारीख पुढे सरकली असली तरी, जनतेतून आलेल्या सूचना आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राजकारण आणि सत्ताकारणाच्या पलीकडे असलेली सामाजिक बांधिलकी जपत, भाजप कोल्हे गट आणि मित्रपक्षाने आपल्या 'विश्वासनामा'तील आश्वासनं प्रत्यक्षात उतरवण्यास सुरुवात केली आहे. याच उद्देशाने, आज ७ डिसेंबर रोजी सकाळी गोदामाई प्रतिष्ठान आणि संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आल्याचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे.