बुलढाणा: ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा पाताळगंगा नदीत जलसमाधी आंदोलन करु - शेतकरी योद्धा कृती समितीचे अध्यक्ष बालाजी सोसे
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा देऊळगाव राजा तालुक्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अन्यथा पाताळगंगा नदीच्या पुरात जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी योद्धा कृती समितीचे अध्यक्ष बालाजी सोसे यांनी दिला आहे.