नाशिक: कलाकाराच्या अंतःविश्वाचा वेध घेणारे ‘चार भिंतींचं घर’ प्रेक्षकांसमोर
Nashik, Nashik | Nov 30, 2025 कलाकाराच्या जीवनातील संघर्ष, घरातील नातेसंबंधांची ताणतणावपूर्ण घुसमट आणि सहजीवनातील आधाराचे महत्त्व सांगणारे ‘चार भिंतींचं घर’ हे दोन अंकी नाटक लेखक-दिग्दर्शक पल्लवी पटवर्धन यांनी प्रभावीपणे रंगमंचावर उभे केले आहे. कलाक्षेत्रातील अस्थिरतेशी झुंज देणाऱ्या एका नटाच्या जगण्याचा प्रवास या नाटकातून जिवंत होतो. झेप सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, नाशिक निर्मित हे नाटक ‘पैलतीरावरून पैलतीराकडे जाणारा प्रवास’ मांडत प्रेक्षकांना भावनिक स्पर्श करून जाते.