जमिनीच्या व्यवहारात १५ लाखांची फसवणूक प्लॉट विक्रीच्या नावाखाली चुकीची चतु:सीमा दाखवून आणि बनावट ताबा पावती देऊन तब्बल १५ लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मावळ तालुक्यातील दारूंब्रे गावात घडली.