साकोली: मुलीला साकोली बसस्थानकवर सोडून गावाकडे निघालेला वडिलांवर झुमेरी नाल्याजवळ काळाची झडप,अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले
जांभळी सडक येथील छोटेलाल गणाजी गेडाम वय 60 हे शुक्रवार दि.7 नोव्हेंबरला रात्री आठ वाजता मुलीला साकोली बसस्थानकावर सोडून गावाकडे परत येत असताना साकोली पासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या झुमेरी नाल्याजवळ अज्ञात वाहनाने छोटेलाल गेडाम यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. छोटीलाल गेडाम हे स्कुटी क्र.MH36AQ0344या गाडीने येत असताना महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिली.ही माहिती भंडारा जिल्हा पोलीस वार्तापत्रद्वारे शनिवार दि.8 नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता देण्यात आली