कळमनूरी: डिग्रस बुद्रुक शिवारात शेतातील आखाड्यावरून कोंबड्या गेल्या चोरीला,आखाडा बाळापूर पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
कळमनुरी तालुक्यातील डिग्रस बु. शिवारात शेतकरी राजू शामराव हामदे यांच्या शेतातील आखाड्यावरून 21 कोंबड्या व पिल्ले चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे . याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली आहे .याप्रकरणी पोलिस अमलदार पी जी चव्हाण हे पुढील तपास करत आहेत .