वनोजा गावात कोल्ह्याचा हल्ला; नऊ जण जखमी मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे कोल्ह्याने केलेल्या हल्ल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. काल (सोमवार) सायंकाळपासून एका कोल्ह्याने गावात धुमाकूळ घालत नऊ जणांना चावा घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास गावात आलेल्या कोल्ह्याने अचानक गावकऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात सुरुवातीला दोन लहान मुले आणि दोन मोठ्या व्यक्ती जखमी झाले. जखमींना तातडीने प्राथमिक उपचार करून मंगरुळपीर ग्रामीण रुग्णा