श्रीरामपूर मध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीच्या सभेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी शब्दात उल्लेख करून अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर तेथे शिवप्रेंमीनी हल्ला केला होता. त्यानंतर शिवप्रेमींवर गुन्हे दाखल झाले होते. महाराजांचा अवमान करणाऱ्या सचिन गुजर यांच्यावर गुन्हा दाखल करून शिवप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी राहुरीत हिंदुत्ववादी संघटनेने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना आज गुरुवारी दुपारी निवेदन दिले आहे.