ठाणे: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ताफा काँग्रेस व भूमिपुत्र संघटनेने मिरभाईंदर येथे अडवला
Thane, Thane | Nov 8, 2025 आज दिनांक 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 2च्या सुमारास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ताफा काँग्रेस व भूमिपुत्र संघटनेने मिर भाईंदर येथे अडवला. महामार्गावर वाढती वाहतूक कोंडी, मोठमोठे पडलेले खड्डे यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील स्थानिक नागरिकांनी थेट प्रताप सरनाईक यांचा ताफा अडवून एन एच आय च्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला.