खामगाव: ऑटो रस्त्यामध्ये का लावला यावरुन दोघात वाद होवून एकाने दुसऱ्यास काठी मारुन जखमी केल्याची घटना कुंबेफळ येथे घडली
ऑटो रस्त्यामध्ये का लावला यावरुन दोघात वाद होवून एकाने दुसऱ्यास काठी मारुन जखमी केल्याची घटना कुंबेफळ येथे ७ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली.आज दिनांक ९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की,याबाबत उमेश भाऊराव इंगळे (२८) रा. कुंबेफळ यानी हिवरखेड पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, घराजवळ पाहुण्यांचा ऑटो उभा होता. त्यावेळी राहुल निनाजी इंगळे रा कुंबेफळ हा आला व त्याने म्हटले की रस्त्यामध्ये ऑटो का लावला.या कारणावरून वाद घालून शिवीगाळ करून मारहाण केली.