जे दहशतवाद आणि द्वेष पसरवतात, अशा लोकांशी हस्तांदोलन करणे योग्य नाही – समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी
समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार आबु आझमी यांनी मंगळवार, १६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान खेळाडूंच्या हस्तांदोलनावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी खेळाडूंच्या कृतीचे कौतुक करत म्हटले की, जे दहशतवाद आणि द्वेष पसरवतात, अशा लोकांशी हस्तांदोलन करणे योग्य नाही. खेळाडू खेळायला जातील आणि त्यांनी हस्तांदोलन न करणे चांगले आहे, असेही ते म्हणाले.