नागपूर ग्रामीण: बीएसएनएल ऑफिस मधून चोरी करणाऱ्या आरोपींना वाडी पोलिसांनी केली अटक
11 नोव्हेंबरला रात्री सात वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणेवाडी हद्दीतील बीएसएनएल ऑफिस मध्ये चोरी करून अज्ञात आरोपींनी मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी वाडी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करून आरोपी साबीर तमीज शेख, विकी हनवते, रितेश तिरपुडे यांना अटक केली असून त्यांच्याकडून केबल जाळून त्यातून काढलेला तांब्याचा तार व इतर साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा माल जप्त करण्यात आला.