कळमनूरी: चाफनाथ येथे एक दिवसीय हळद उत्पादक शेतकरी कार्यशाळा व पिक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन
कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर आणि कृषी विभाग हिंगोली च्या वतीने कळमनुरी तालुक्यातील चाफनाथ येथे दि १० नोव्हेंबर रोजी तेथील प्रगतिशील शेतकरी माधवराव चोतमल यांच्या शेतामध्ये एक दिवशी हळद उत्पादक शेतकरी कार्यशाळा व वायगाव हळद वान याविषयी पीक पाहणी कार्यक्रम संपन्न झाला आहे .या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती .