चंद्रपूर : या वर्षातील शेवटचा सुपरमून पाहण्याची दुर्मिळ संधी आज, गुरुवार ४ डिसेंबर रोजी मिळणार आहे. आजचा पौर्णिमेचा चंद्र नेहमीपेक्षा तब्बल ३० टक्के अधिक तेजस्वी आणि १४ टक्के मोठा दिसणार असल्याने खगोलप्रेमींसाठी आजची रात्र विशेष ठरणार आहे. गतवर्षी १७ ऑक्टोबर रोजी शेवटचा सुपरमून दिसला होता. खगोलीय गणनेनुसार, चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने तो महिन्यातून एकदा पृथ्वीच्या अत्यंत जवळ येतो. ज्यावेळी हा क्षण पौर्णिमेला साधतो, त्यावेळी चंद्राचा आकार प्रत्यक्षात वाढत नसला