गोंदिया: एक डिसेंबरला रात्री दहा वाजता पर्यंत नगरपरिषद नगरपंचायत च्या प्रचार तोफा थंडावणार
Gondiya, Gondia | Nov 29, 2025 महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत च्या सामान्य निवडणुकांसाठी सार्वजनिक प्रचारावर बंदीची कालावधी संदर्भातील सुधारित आदेश 27 नोव्हेंबर रोजी जारी केली आहेत. त्यात आता उमेदवारांना एक डिसेंबरला रात्री दहा वाजता पर्यंत जाहीर प्रचार करता येणार आहे. यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी एक दिवस अतिरिक्त मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशानुसार मतदान सुरू होण्यापूर्वी प्रचार कधी संपणार याबाबत पूर्वीचे तरतूद बदलण्यात आली आहे.