नाशिक: गोदावरी नदीपात्रात पानवेलींनी घातला वेढा , कुंभमेळाच्या आधी गोदापात्र स्वच्छ करण्याची केली जाते मागणी
Nashik, Nashik | Dec 1, 2025 तपोवनातील साधुग्राम मध्ये असलेल्या झाडांच्या तोडीवरून पर्यावरणप्रेमी नाशिककर व मनपा प्रशासनात युद्ध चालू असतांना दुसरीकडे गोदावरी पात्रात मात्र मोठ्या प्रमाणावर पानवेलींचा वेढा घातला गेल्याने कुंभमेळाच्या पूर्वी संपूर्ण गोदापात्र स्वच्छ करण्याची मागणी नाशिकच्या जनतेकडून केली जात आहे.