लातूर: लातूर पोलिसांची मोठी कामगिरी: २१ वर्षांपासून पत्ता बदलत न्यायालयाला चकवा देणाऱ्या मुख्य आरोपी अखेर अटकेत
Latur, Latur | Nov 30, 2025 लातूर -लातूर पोलिसांच्या विशेष पथकाने २००४ पासून विविध ठिकाणी वास्तव्य बदलून पोलीस आणि न्यायालयाला फसवणूक करणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी बालाजी उर्फ बंटी सुधाकर पकाले याला अखेर अटक केली आहे. हा आरोपी सशस्त्र दरोडेखोर असून त्याच्यावर मारहाणी, जखमी करण्याचा आणि रोकड-घड्याळाची जबरी लूट करण्याचा गुन्हा होता.सप्टेंबर २००४ मध्ये भास्कर हरिश्चंद्र शिंदे यांच्याविरुद्ध तलवार-चाकूमुळे मारहाण करून त्यांचा रोकड आणि घड्याळ लुटल्याचा खटला गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद झाला होता.