कोरेगाव: महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका : आमदार शशिकांत शिंदे
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी ही एकत्रितपणे उतरून निवडणुका लढवणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. मुंबईत मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकांबाबत सविस्तर माहिती दिली.प्रत्येक जिल्हाध्यक्षांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असेल, मात्र तो स्थानिक आहे.